या अभिनेत्रीने आईच्या बर्थ-डेला कापला सोन्याचा केक

0

नवी मुंबई : बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. उर्वशी नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओज आपल्या चाहत्यांसाठी आणि चाहत्यांसबोत शेअर करत असते. नुकताच या अभिनेत्रीने आपल्या आईचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. त्यात विशेष करून तिने आपल्या आईला ‘गोल्ड प्लेटेड केक’ भेट दिला.

ज्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेले आहेत. ज्यात उर्वशी निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये खूप आकर्षक दिसत आहे. उर्वशीची आई मीरा रौतेला काळ्या रंगाच्या वन पीसगाउनमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना उर्वशी रौतेलाने कॅप्शन लिहिलंय की, “माझ्या आईला मी वाढदिवसानिमित्त गोल्ड प्लेटेड केक भेट देऊन सरप्राईज केलं. माझी आई माझ्यासाठी सर्वकाही आहे.” तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या आणि प्रशंसकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत.

उर्वशी रौतेला नुकतीच ‘वर्जिन भानुप्रिया’ या पिक्चरमध्ये दिसली होती. उर्वशीचा ‘वो चाँद कहाँ से लाओगी’ हा व्हिडिओ सुद्धा रिलीज झाला. इतकंच नाही तर उर्वशी च्या तेलगु आणि हिंदी थ्रिलर फिल्म ‘ब्लॅक रोज’ शूटिंगही नुकतंच पूर्ण झालंय. उर्वशीच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात लाईकदेखील केले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.