कबीर सिंग या हिंदी चित्रपचात काही मिनिटांचा सीन आहे तिचा. पण, प्रेक्षकांच्या ती चांगलीच लक्षात राहिली. तो ग्लास फोडणं आणि शाहीद कपूर तिच्या मागं लागणं आणि दम लागेपर्यंत जोरात धावणं, हा सीन कुणाला आठवत नाही. तो सीन करणारी होती मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात. वनिता पुन्हा एकदा चर्चेत आलीय, तिने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे.
वनिताने एका कॅलेंडरसाठी चक्क न्यूड फोटो शूट केलेले आहेत. तिने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंडवर शेअर केलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांची तिचे भरभरून कौतुक केले आहे. आणि प्रेक्षकांचाही भुवया उंचावल्या आहेत. तिचाहा फोटो चांगलाच व्हायरल झालेला आहे.
खरंतर वनिता अंगाने जाड आहे. परंतु, आपल्या वजनाचा कुठेही न्यूनगंड बाळगलेला दिसत नाही. हीच तिच्या फोटोची खासियत आहे. वनिता फोटोबरोबर एक पोस्टही लिहिली आहे की, “मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. कारण, मी मी आहे.” तिची ही कॅप्शन अनेकांना अफलातून आवडलेली आहे. वनिताचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढलेला आहे.