हॉटेल व्यवसायिकाची रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या

0

पुणे : जिल्ह्यातील दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

दादा लक्ष्मण नलगे असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. दौंड पोलीस ठाण्याशेजारील तारामती इमारतीमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दादा नलगे यांनी दौंड येथील राहत्या घरी स्वतःच्या रिव्हॉलरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दौंड पोलीस ठाण्यात दादा नलगे यांच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच नलगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दादा नलगे हे श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचा मुलगा होते.

Leave A Reply

Your email address will not be published.