५ जानेवारीला ‘ईडी’ विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार? 

0

मुंबई ः शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि नंतर खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटीशीमुळे शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीला मुंबई, ठाण, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस आणि खासगी गाड्यांमधून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ईडीच्या नोटीसा म्हणजे राज्यातील सरकार पाडण्याचा केंद्राचे षडयंत्र असल्याचे शिवसेनेने म्हटलं होते. वर्षा राऊत यांनी ईडीची नोटीस आलेली पाहून शिवसेना आणखीच आक्रमक होऊन केंद्रावर जोरदार आरोप करत राहिली. यावर ईडीने म्हटलं आहे की, “५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बॅंक खात्यातून आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे चौकशी करायची आहे”, असे ईडीने स्पष्टीकरण दिलेले आहे.

या सगळ्या प्रकरणावर शिवसेना आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरमधून गाड्या भरून शिवसेना रस्त्यावर उतरून ईडीविरोधात आंदोलन करणार असल्याचे दिसते. ५ जानेवारीलाच वर्षा राऊत यांची ईडी चौकशी होणार आहे. त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणाचा केंद्र कसा गैरवापर करत आहे, हे शिवसेनेला अधोरेखित करायचे आहे, यामुळे हे आंदोलन होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.