हटवादी भाजपाला वाटते की, “कायदे मागे घेणं म्हणजे माफी मागणं”

काॅंग्रेस नेते सचिन पायलट यांची शेतकऱ्यांच्या सभेत 'आरएसएस'वर टीका

0

नवी दिल्ली ः “जर तुम्ही शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे. भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे”, अशी टीका आरएसएसवर काॅंग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली.

जयपूरमध्ये शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पायलट पुढे म्हणाले की, “आत्ताच्या काळात तुम्ही ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलता. विवाहासंबंधी कायदे करत आहात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहात. इतिहास साक्षी आहे, देशात बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. तर काही मोजकेच इतर पक्षाचे होते. भाजपामध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. मला याचं वाईट वाटतं की सध्या देशातील शेतकरी केवळ आंदोलनच करत नाहीत तर त्यांच्या मनात भीती देखील आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता आहे”, असेही मत सचिन पायलट यांनी व्यक्त केला.

“शेतकरी आंदोलनाचा मुद्दा हा इतकाही क्लिष्ट नाही की, तो केंद्र सरकार सोडवू शकत नाही. तुम्हाला फक्त इतकचं सांगायचंय की आम्ही यामध्ये किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) अंतर्भाव करतो आहोत आणि तिन्ही कायदे मागे घेत आहोत. केंद्रानं हे समजून घ्यायला हवं की काही कायदे मागे घेतल्याने कुठलंही नुकसान होणार नाही. जर केंद्र सरकारनं कायदे मागे घेतले तर आम्ही त्यांचे आभार मानू. पण ते हे कायदे मागे घेणार नाहीत. कारण, ते हटवादी आहेत. कायद्यात सुधारणा करणे, ते मागे घेणे किंवा माफी मागणं ही मोठी गोष्ट आहे, त्यामुळे नेत्यांची उंची वाढते, ही लाज वाटण्याची बाब नाही”, असे मत पायलट यांनी सभेत व्यक्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.