मुंबई : सिनेतारकांच्या खासगी आयुष्याविषयी सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल आणि आकर्षण असते. विशेषतः त्यांच्या अफेअर आणि प्रेम संबंधाविषयी. अभिनेते आणि अभिनेत्री यांनी आपली गुपितं कितीही पडद्याआड ठेऊ द्या चाहते तपास काढतातच. आता हेच बघा ना… आपल्या कॅटने म्हणजेच कटरीना कैफ एक फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
या फोटोमधे कॅट आणि तिची बहीण इसाबेल एकमेकांसोबत बसून आहेत. पण, चाहत्यांनी मात्र या फोटोत आणखी एक चेहरा शोधून काढलाय जो अभिनेता विकी कौशलचा आहे. कॅटने तो फोटो सोशल मीडियावरून डिलीट केला. पण तोपर्यंत तो फोटो व्हायरल झाला.कॅट आणि विकीमधील गुपित चाहत्यांसमोर उघड झालं.
न्यू इयरच्या पहिल्या दिवशी कॅटची बहीण इसाबेलने अलिबाग व्हेकेशनचे काही फोटो शेअर केलेत. विकी कौशलनेही त्याचा भाऊ सनी सोबतचे फोटो पोस्ट केलेत. पण या दोन्ही फोटोतील बॅकग्राऊंड आणि स्विमिंग पूल पाहून विकी, कॅट, इसाबेल आणि सनी हे चौघेही अलिबागला सोबत असल्याचा पुरावा चाहत्यांना मिळाला.