जेव्हा सगळे लोक ‘ति’च्या विरोधात होते तेव्हा सलमान, आमीरने तिच्या धाडसाचे कौतुक केले

0

मुंबई : सध्या सोशल मीडियाचे युग आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर बरेच सेलिब्रिटी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. पण, जेव्हा सोशल मीडियाचा इतका गवगवा नव्हता. तेव्हाही काही सेलिब्रिटी खळबळ माजवून सतत प्रसिद्धी झोतात राहत होती. अशीच एक कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ‘ममता कुलकर्णी’.

आपल्या मोहक सौंदर्याने,  बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाने ममताने लोकांना अक्षरशः वेडं केलं होतं. 1992 मध्ये ‘तिरंगा’ या सिनेमामधून ममता कुलकर्णी ने बॉलीवूडमधे पदार्पण केलं. या चित्रपटात तिची भूमिका जरी लहान होती तरी ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

1993 मधे तिचा ‘आशिक आवारा’ चित्रपट आला आणि ती प्रकाशझोतात येऊन लोकप्रिय झाली. याच दरम्यान प्रसिद्ध मॅगझीन ‘स्टारडस्ट’ च्या कव्हरशूटसाठी नवीन चेहरे शोधत असताना अनेक अभिनेत्रींनीं नाकारलेला प्रस्ताव ममताने स्वीकारले आणि खळबळ माजवली. कारण ते फोटोशूट साधेसुधे नसून टॉपलेस फोटोशूट होते. या फोटोशूटवरून ममता कुलकर्णी वादाच्या भोवऱ्यात अडकली.

हे फोटोशुट रसिकांना रुचले नाही. तिला चाहत्यांच्या टिकेला सामोरे जावे लागले. हे फोटोशूट पब्लिश होताच ममता कुलकर्णीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. हे फोटोशूट पाहून रसिकांच्या तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इतकंच नाहीतर काही लोकांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. एकीकडे रसिकांचा तीव्र संताप व्यक्त होत असताना सलमान खान, आमिर खानसारख्या अभिनेत्यांनी मात्र ममताच्या धाडसाचे कौतुक ही केले. ममता कुलकर्णीचे नाव ड्रग तस्करी करणाऱ्या विजय गोस्वामीसोबत ही जोडले गेले होते. तसेच ममताचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत ही प्रेमसंबंध होते. त्यानंतर मात्र ममता कुलकर्णी ने बॉलीवूडमधून सन्यास घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.