करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले महाराष्ट्रात ८ रूग्ण सापडले ः टोपे

0

मुंबई : “ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन करोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे”, अशी माहिती राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या स्ट्रेसने आता महाराष्ट्रात ८ रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचं भारताने यशस्वीरित्या ‘कल्चर’ केलं आहे. ‘कल्चर’ ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेशी नियंत्रित परिस्थितीत तयार केल्या जातात. विशेषतः त्यांच्या नैसर्गिक वातावरणाबाहेर ही प्रक्रिया केली जाते”, अशी माहिती यापूर्वीच आयसीएमआर यांनी शनिवारी दिली होती.

या नव्या विषाणूचा देशात ३८ लोकांना संसर्ग झालेला आहे. हा नवी विषाणू ७० अधिक संसर्गजन्य आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नव्या विषाणूमुळे अगोदरच जगभरात खळबळ माजली असताना भारतात योग्य खबरदारी घेतली गेली होती. मात्र, तरीही नव्या विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण भारतात आढळल्याने भारतातही खळबळ माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.