पुण्यात नवीन कोराना व्हायरसचा शिरकाव, ब्रिटनहुन आलेला एक जण पॉझिटिव्ह

0
पुणे : कोरोना व्हायरसचा नव्या स्ट्रेनचा पुणे शहरात शिरकाव झाला आहे. ब्रिटनहुन भारतात परतलेल्या आठ प्रवाशांना नव्या स्ट्रेन लागण झाल्याचे आढळून आले या आठ प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या आठ मध्ये पुण्यातील एका नागरिकांचा समावेश आहे.
कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली होती. भारतात ब्रिटहुन जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व प्रवाशांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर विमान वाहतुकी बाबतचे नियमही काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.
दरम्यान ब्रिटन हुन येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी भारतातील प्रत्येक विमानतळावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळावरच यात सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यांच्यासाठी  विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचया नव्या स्ट्रेनची बाधा झालेल्या काही नागरिकांना विमानतळावरून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तसेच ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत त्यांनाही काही दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल पत्रकार परिषद घेत या नव्या स्ट्रेन विषयी माहिती दिली. ब्रिटन परतलेल्या ज्या आठ नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसचा नव्या स्ट्रेनची लक्षणे दिसून आली त्यामध्ये मुंबईतील पाच जण, ठाणे मीरा भाईंदर आणि पुण्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 
Leave A Reply

Your email address will not be published.