पुढील १० दिवसांमध्ये लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता
कोविडयोद्ध्यांच्या लसीकरणासाठी नोंदणी आवश्यकता नाही : आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली ः डीसीजीआयने ३ जानेवारीला लसींच्या आपतकालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांमध्ये लसीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. कोविडयोद्ध्यांनी नोंदणीची आवश्यकता असणार नाही. येत्या १० दिवसांमध्ये लसीकरण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अंतिम निर्यण सरकारला घ्यायचा आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
राजेश भूषण पत्रकारपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, करोना लसीला मान्यता मिळाल्याने येत्या १० दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होऊ शकते.सीरम कोलिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन या दोन लसींना आपतकालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.
जगाच्या तुलनेत १० लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्ण आपल्या देशामध्ये आढळत आहेत. १० लाख लोकसंख्येमागे ७ हजार ५०४ केसेस आहेत. तोच दर इतर देशांमध्ये २२ हजार, ३५ हजार, ४० हजार आणि ६० हजारापर्यंत आहे. मृत्यूदराचा विचार केला तर, भारतात १० लाख लोकसंख्येमागे फक्त १०८ इतका आहे. तर, इतर देशांमध्ये १२०० पर्यंत आढळतो.