सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरुद्ध झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक मोहोळ तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभारलेल्या ८ हजार ४५५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २ हजार २२५ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
सांगोला तालुक्यातील तिप्पेहळी, मेथवडे, वाटंबरे, चोपडी, गायगव्हाण तर बार्शी तालुक्यातील भोयरे, जामगाव (पा), खडकलगाव, मुंगशी (आर), पिंपळगाव (पा), जहानपूर, मालवंडी या सात ग्रामपंचायती बिनविरुद्ध झाल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, संगदरी, तिर्थ, दिंडूर, लिंबी चिंचोळी आणि बाळगी या सहा तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी व पडसाळी या दोन ग्रामपंचायती बिनविरुद्ध झाल्यात. माळशिरस तालुक्यातील गिरझणी व गोरडवाडी आणि पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरुद्ध झाली आहे.
मोहोळ तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमध्ये अनगर, बिटले, खंडोबाची वाडी, कुरणवाडी, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, पासलेवाडी/गलंदवाडी, वाघोली, वडवळ, शिरापूर मो, पिरटाकळी, आढेगाव यांचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यातील उडगी, आंदेवाडी बु, नागनहळ्ळी, तोळणूर, मातनहळ्ळी, हंद्राळ, बणजगोळ, शिरसी या नऊ ग्रामपंचायती बिनविरुद्ध झाल्या आहेत. मंगळवेढा तालुक्यातील मुढवी, माढा तालुक्यातील निमगाव टें, जामगाव, सापटणे (भोसे), महातपूर, वडाचीवाडी (त. म.), खैराव, धानोरे, फुटजवळगाव या आठ ग्रामपंचायती बिनविरुद्ध झाल्यात.