भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कात्रज प्राणी संग्रहालयातील चार हरणांचा मृत्यू

0
पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्यावेळी प्राणी संग्रहालयात प्रवेश करत चार हरनांची शिकार केली. रात्रीच्यावेळी प्राणिसंग्रहालयात प्रवेश केलेल्या कुत्र्यांनी हरणांचा कळप असल्या खंदकात घुसून दोन नर आणि दोन मादी अशा एकूण चार हरणांची शिकार केली आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक हरीण गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राणीसंग्रहालयातील सुरक्षारक्षकांनी हरणांचा कळप असलेल्या खंदकाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत या कुत्र्यांनी चार हरणांचा फडशा पाडला होता. त्यानंतर या कुत्र्यांना डॉग स्कॉड च्या मदतीने भूल देऊन पकडण्यात आले आहे.
दरम्यान कात्रज गावठाण परिसरातील ओढ्याचे काम सुरू असताना सुरक्षितता न बाळगण्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. त्या ठिकाणी लावण्यात आलेला पत्रा उचकटून भटक्या कुत्र्यांनी प्राणी संग्रहालयात प्रवेश केला आणि जवळच असलेल्या खंदक आतील हरणांच्या कळपावर हल्ला चढवला. यामध्ये चार हरणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक हरीण गंभीर जखमी झाले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.