मुंबई ः माजी आमदार बाळासाहेब यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता, यामुळे भाजपाने शिवसेनेला नाशिकमध्ये चांगलाच धक्का दिला होता. त्यामुळे शिवसेना भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण, नाशिकमधील भाजपाचे २ बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
माजी आमदार वसंत गिते आणि भाजपाचे उप प्रदेशाध्यक्ष सुमील बागुल हे दोन भाजपाचे नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी नाशिकचे महापौर विनायक पांडे आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते, असंही सांगितलं जात आहे.
सुनील बागुल आणि वसंत गिते हे दोघेही पूर्वी शिवसेनेचे नेते होते. २१ डिसेंबरला माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मूळात बाळासाहेब सानप हे भाजपामध्ये होेते. नंतर ते राष्ट्रवादीत गेले, त्यानंतर शिवसेनेत गेले. आणि पुन्हा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेश करतेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, आणखी काही नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.