पिंपरी चिंचवड शहरात यूके स्ट्रेन कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आढळले

0

पिंपरी : इंग्लंडमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तीन जणांमध्ये यूके स्ट्रेन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या तिघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

२६८ प्रवाशी इंग्लडमधून मुंबईमध्ये उतरले होते त्यांचा शोध महानगर पालिकेने घेतला. त्यापैकी संशयित सात जणांचे नमुने पुण्यातील NIV ला पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला व तीन जणा यूके स्ट्रेन करोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दिवसभरात १५० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ९१ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९७ हजार ४४२ वर पोहचली असून, यापैकी ९३ हजार ९९७ जण करोनातून बरे झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.