करोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी केंद्राची जोरदार तयारी
नवी दिल्ली ः देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे, या पार्श्वभूमीवर देशातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांची रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन सुरू आहे. आतापर्यंत देशातील सुमारे ७३६ जिल्ह्यांमध्ये ही ड्राय रन सुरू असणार आहे.
यापूर्वी गुजरात, पंजाब, आसाम आणि आंध्र प्रदेशात घेण्यात आलेल्या ड्राय रनचे चांगले परिणाम दिसलेले असून केंद्राने आता संपूर्ण देशात हा ड्राय रन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशभरात करोना लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.
२८-२९ डिसेंबरला ४ राज्यांमध्ये ड्राय रन घेण्यात आली होती. २ जानेवारीला देखील सर्व राज्यांमध्ये ड्राय रन पार पडली. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर हा ड्राय रन घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांनी यासंबंधीची मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक गुरुवारी घेतली. यामध्ये करोनाच्या लसींबद्दल पसरत चाललेल्या चुकीच्या माहितीबद्दल त्यांनी डाॅ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली.
मंगळवारीच आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, येत्या १० दिवसांमध्ये करोना लसीकरणाला सुरूवात होऊ शकेल. डीसीजीआयकडून करोना लसीच्या आपतकालीन वापरला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अंदाजे १३ किंवा १४ जानेवारीला देशात करोना लसीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.