भारत बायोटेक नाकावाटे देण्यात येणारी लस आणणार

0

नवी दिल्लीः  कोरोना वर भारत बायोटेक नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसची चाचणी करणार आहे. Nasal लस ही नाकाद्वारे दिली जाते. पण भारतात मंजूर झालेल्या दोन लस (कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन) हातावर इंजेक्शन देऊन दिल्या जातात.

भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीत दोनऐवजी फक्त एकच डोस देण्याची आवश्यकता असेल, अशी माहिती भारत बायोटेकचे संचालक डॉ. कृष्ण एल्ला यांनी दिली. नाकाद्वारे देण्यात येणारी लस ही इंजेक्शनने दिल्या जाणाऱ्या लसला चांगला पर्याय आहे, असं संशोधनातून समोर आलं आहे.

येत्या दोन आठवड्यात Nasal Covaxin ची चाचणी सुरू होईल. नाकाद्वारे देण्यात येणारी लस ही इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसपेक्षा अधिक चांगली आहे, याचे आमच्याकडे पुरावे आहेत. भारत बायोटेक लवकरच या लसच्या चाचणीसाठी डीसीजीआयसमोर प्रस्ताव ठेवेल, असं डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.