मुंबई ः अभिनेता सनी देओलने बेताब या चित्रपटातून बाॅलिवुडमध्ये पदार्पण केले होते, तेव्हापासून सनी बाॅलिवुडमध्ये सक्रिय आहे. खरंतर पहिल्या चित्रपटापासूनच सनीच्या अफेअरसंबंधीच्या बातम्या होत्या. त्याला वैतागून ही बातमी छापणाऱ्याला सनी देओलने मारण्याची धमकी दिली होती.
पहिल्या चित्रपटात सनीसोबत अभिनेत्री अमृता सिंह होती. त्यावेळी सनी आणि अमृता यांच्या रिलेशनशीपबद्दल बातम्या छापल्या जात होत्या. मात्र, अशा बातम्यांना घेऊन सनी खूपच वैतागला होता. इतकंच नाहीतर, एका मुलाखतीत सनीला प्रश्न विचारला होता की, “तुमच्या अफेअरच्या बातम्या तुमच्या पत्नीपर्यंत पोहोचत असतील, तेव्हा तुम्हाला का वाटते?”
त्यावेळी सनीने उत्तर दिले होते की, “तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर, तुम्हाला हे सर्व झेलावं लागेल. तुमचे नाव कोणाशीही जोडले जाऊ शकते. अमृता सिंहसोबत माझे अफेअर आहे, अशा बातम्या खूप छापल्या जात होत्या. मीदेखील अशा बातम्या वाचल्या आहेत. जे कोणी या बातम्या छापते त्यांचे मी काय करू शकतो. फक्त एक करू शकतो की, या बातम्या छापणारा मला मिळाला तर, मारू शकतो.”