बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे ः कंगना

0

मुंबई ः बाॅलिवुडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत सतत आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट करत चर्चेत राहत असते. कंगानाने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेले आहे. मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर तिने एक विधान केलेले आहे. कंगना म्हणते की, “सामुहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींनी भर चौकात फाशी दिली पाहिजे”, असे मत कंगानाने व्यक्त केले आहे.

कंगना सध्या भोपाळमध्ये असून ‘धाकड’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिने घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिने वादग्रस्त मत व्यक्त केले. कंगाना म्हणाली की, “देशातील अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार करणारा आरोपींना जोपर्यंत भर चौकात फाशी दिली जात नाही, तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत, त्या अनुषंगाने कडक कारवाई करत पाच-सहा उदाहरणे समाजासमोर ठेवली पाहिजेत”, असे मत कंगानाने व्यक्त केले आहे.

“सौदी अरबमधील कित्येक देशांमध्ये आजही बलात्कार करणाऱ्या आरोपीला भर चौकात लटविले जाते. अशाच कायद्यांची भारतालाही गरज आहे. त्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल करावा. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पीडितेवर असल्याने बऱ्याचदा आरोपी कायदेशीर कचाट्यातून सुटतो, त्यामुळे कायदे आणखी कडक करण्याची गरज आहे”, असे सडेतोड मत कंगनाने व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.