ही कारवाई पिंपरी चिंचवड येथील सांगवी परिसरात करण्यात आली आहे. ऋतिक बाळासाहेब वाळके आणि विलास शिवाजी अभांगे यांच्याविरुद्ध कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; वाळके आणि अभांगे हे दोघे पुणे महानगरपालिकेच्या नगर रोडवरील क्षेत्रीय कार्यलयात कार्यरत आहेत. तक्रारदार यांची टपरी फुटपाथवर असते. त्यामुळे त्या टपरीवर कारवाई न करण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागितली.
ही रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. पुढील तपास सुरु आहे. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.