शिर्डी, साईबाबा दर्शन घ्यायचेय…वाचा नवीन नियम

0
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम करुनही भक्तांची गर्दी थांबत नसल्याने शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर संस्थांनने नवीन नियम जाहीर केला आहे. गुरुवार, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांना विना नोंदणी प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शन दिले जाऊ शकते. त्यामुळे साईबाबा दर्शनासाठी येताना पुर्वनियोजन करुन व संस्थानचे online.sai.org.in संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करुन दर्शनास यावे, असे वारंवार आवाहन संस्थान प्रशासनाने सातत्याने केले आहे.

मात्र त्यानंतरही श्री साईबाबांचे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी विशेषतः गुरुवार , शनिवार , रविवार आणि इतर सण अथवा सुट्टयांचे दिवशी होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आता संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

दर गुरुवारी, शनिवारी, रविवारी तसेच इतर सण व सुट्टयांचे दिवशी श्री साईबाबांचे दर्शनास भक्तगणांनी संकेतस्थळावर जाऊन सशुल्क व निशुल्क दर्शनपास / आरती पास आरक्षित करूनच येणे बंधनकारक आहे. या दिवशी म्हणजेच गुरुवार , शनिवार , रविवार तथा सुट्टया व सणांचे दिवशी भक्तांची अलोट गर्दी होत असल्याने श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.