देशात बर्ड फ्लू वेगाने हातपाय पसरतोय! 

दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हेल्पलाईन नंबर जारी 

0

नवी दिल्ली ः देशातील १० राज्यांमध्ये बर्डफ्लूने आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केलेली आहे. एव्हियन एन्फ्लुएन्जा पसरत आहे, हे स्पष्ट झालेले आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि आता उत्तराखंडातही बर्ड फ्लूची खात्री करण्यात आली आहे. आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेशस हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये कोंबड्या आणि इतर पाळीव पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे संक्रमण आढळलेलं असलं तरी, अजून तरी मानवांमध्ये त्यांचे संक्रमण आढळलेले नाही. बर्ड फ्लूला रोखण्यासाठी कोंबड्यांची विक्री आणि कुक्कुट पालनातील उत्पादनावर बंदी न घालण्याची विनंती करण्यात आली आहे. असे असले तरी ग्राहकांनी चिकन आणि अंडी योग्य पद्धतीने शिजवून खाण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीत पसरत जाणाऱ्या बर्ड फ्लूमुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विविध आदेश देण्यात आले आहेत. तसेच संक्रमण रोखण्यासाठी हेल्पलाईन नंबरही देण्याच आला आहे. नागरिकांनी २३८९०३१८ यानंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिवंत पंक्ष्यांच्या आयातवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचेबरोबर महाराष्ट्रातही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून १९२६ आणि ठाणे महापालिकेडून१८००२२२१८० आणि ०२२-२५३७१०१० या नंबरवर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.