व्हाॅट्सअ‍ॅपनं दिलं स्पष्टीकरण… म्हणे बदल केवळ बिजनेससाठी!

0

नवी दिल्ली ः व्हाॅट्सअ‍ॅपच्या नव्या पाॅलिसीवर संपूर्ण जगातून टीका होत आहे, यावर व्हाॅट्सअ‍ॅपने त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. व्हाॅट्सअ‍ॅप कंपनी म्हणतंय की, “तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे दिलं आहे. कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे”, असा दावाही व्हाॅट्सअ‍ॅप कंपनीने केला आहे.

व्हाॅट्सअ‍ॅप कंपनीने दिलेलं स्पष्टीकरण

व्हाॅट्सअ‍ॅप तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही.

व्हाॅट्सअ‍ॅप तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.

व्हाॅट्सअ‍ॅप तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.

व्हाॅट्सअ‍ॅप तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.

व्हाॅट्सअ‍ॅप  ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.

व्हाॅट्सअ‍ॅप तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकतात.

व्हाॅट्सअ‍ॅप  तुम्ही तुमचा व्हाॅट्सअ‍ॅप डेटा डाउनलोड करु शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.