धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू ः चंद्रकांत पाटील

0

मुंबई ः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि बलात्कार प्रकरण यामुळे राजकारणात चांगलंच वातावरण तापलेलं दिसत आहे. भाजपाने मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी उचलून धरलेली आहे. तशी मुंडे यांनी कबुली जबाब दिलेला आहे. हे कृत्य लोकशाही संकेत, नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यांनी पश्चाताप म्हणून स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असे सांगताना मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करणार आहे”, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेला आहे.

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले होते की, मुंडे यांच्यावरील अजून आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, त्याचा समाचार घेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंडेंनी स्वतःहून काही गोष्टी कबूल केलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत असतील तर जनता त्यांना माफ करणार नाही. निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली, त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.”

“तक्रार केलेल्या महिलेच्या बहिणीशी मुंडे यांचे पंधरा वर्षापासूनचे संबंध,दोन मुलांना स्वतचे नाव लावणे यासंबंधी त्यांनी कबुली दिली आहे. हे सर्व नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या राजीनाम्याची दोन, तीन दिवस वाट पाहू, नंतर भाजपा राज्यभर आंदोलन करेल”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.