धनंजय मुंडे यांच्या विरोधी तक्रारीतील दिरंगाई पोलिसांना महागात पडण्याची शक्यता 

0

मुंबई ः धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने शारीरिक शोषणाची लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी अजूनही कारवाई केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ललिताकुमारी निवड्याद्वारे एफआयआर नोंदवून नंतर चौकशी करण्याचे बंधन पोलिसांना घातलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी ही दिरंगाई भोवण्याची शक्यता आहे.

एका महिलेने बलात्कार आणि नंतर ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला आहे. ही तक्रार पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक, गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पंतप्रधान कार्यालयातही पाठविण्यात आली आहे. लेखी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, त्याबाबत पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
महिलेच्या वकिलांनी सांगितले की, “कलम १६६-अ अन्वये दखलपात्र गुन्ह्याविषयी एफआयआर नोंदवून घेतला नाही, तर संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला ६ महिने ते २ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तरीही, मंत्री मुंडे यांच्याविरुद्धच्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवर ओशिवरा पोलिस एफआयआर नोंदवून घेत नाहीत”, अशी माहिती वकिल रमेश त्रिपाठी यांनी दिले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.