पोलिसांनी तात्काळ सत्य बाहेर आणले पाहिजे ः धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

0

मुंबई ः “धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं धनंजय मुंडे याचं आहे. आपण कोर्टात गेल्याचं धनंजय मुंडे सांगत आहेत. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. तात्काळ पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे याच्या प्रकरणावर दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. भाजपानेही यावर आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. राजीनामा दिला नाही तर, राज्यभर आंदोलन करू असा इशारा भाजपाने दिलेला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा आंदोलन करण्याचा इशार दिला आहे. तसेच भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे धनंजय मुंडेंनी माहिती लपविल्याची तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनीदेखील धनंजय मुंडेंच्या राजीनामाच्यी मागणी केली आहे. असे असेल तरी मुंडेच्या बाजू घेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनीदेखील विरोधीपक्षासमोर शड्डू ठोकत उभे राहिलेले दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.