आकुर्डीतील श्री खंडोबाची यात्रा यंदाच्या वर्षी रद्द

0
puneपिंपरी : दरवर्षी प्रमाणे जानेवारी १९ व २० ला साजरी होणारी आकुर्डीतील श्री खंडोबाची यात्रा या वर्षी कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे.

दरवर्षी विविध गावातून लाखोच्या संख्येने श्री खंडोबाच्या यात्रेला भाविक येत असतात. तसेच अनेक प्रकारची दुकाने खेळणी येत असतात. यात्रेच्या निमित्ताने कुस्तीचा आखाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असायचे.

पण कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे राज्यशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत यंदाची यात्रा श्री खंडोबा ट्रस्टच्या विश्वस्तांनी रद्द केली आहे.आणि यात्रेच्या दिवशी श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती श्री खंडोबा ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.