रॉबर्ट वढेरांची ‘ईडी’ चौकशी; आज न्यायालयात सुनावणी

0

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अर्जामध्ये रॉबर्ट वढेरा आणि महेश नागर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. न्यायामुर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजदीपक रस्तोगी आणि भानु प्रताप बोहरा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ईडीची बाजू न्यायालयासमोर मांडतील. तर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते केटीएस तुलसी हे वढेरा यांची बाजू मांडणार आहेत.

सन २००७ मध्ये वढेरा यांनी स्काइलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने एक कंपनी सुरु केली होती. रॉबर्ट वढेरा आणि त्यांची आई मौरीन हे दोघे या कंपनीचे निर्देशक होते. नंतर कंपनीचे नाव बदलून स्काइलाइट हॉस्पिटॅलिटी लिमिटेड लायबिलिटी असं करण्यात आलं. नोंदणीच्या वेळी ही कंपनी रेस्तराँ, बार आणि कॅन्टीनसारख्या सेवा पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

वढेरा यांच्या कंपनीने २०१२ साली कोलायत क्षेत्र येथे काही दलालांच्या मदतनीने २७० बिगा जमीन ७९ लाखांना विकत घेतली. बीकानेर येथे भारतीय लष्कराच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. यासाठी विस्थापित करण्यात आलेल्या लोकांना दुसरीकडे १४०० बिगा जमीन देण्यात आली होती. याच जमीनीच्या कागदपत्रांमध्ये घोळ करुन ही जमीन वढेरा यांच्या कंपनीला विकण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.