ट्रकने 18 मजुरांना चिरडले; 14 जणांचा जागीच मृत्यू

0
सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघात झाला आहे. पिपलोद गावांनजीक एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 18 मजूरांना चिरडले. त्यामध्ये, 14 जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत.

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत 14 जणांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या घनटेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, गाडी नियंत्रणात न आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन तो ट्रक झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला.

या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीचं काम करत असून सर्वचजण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.