नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात वाहन उद्योग मंदावला आहे. यासाठी देशातील खासगी क्षेत्रातील बँकांकडून तसेच विदेशी बँकांकडून वाहन उद्योगाच्या कर्जविषयक गरजांच्या पूर्ततेत दोन-तृतीयांश वाटा उचलला जात आहे.
वाहन उद्योगातील छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांना वितरित कर्जाचे एकूण मूल्य पाहता, त्यात सर्वाधिक ४१.४ टक्के वाटा खासगी बँकांचा, त्या खालोखाल २४.४ टक्के वाटा विदेशी बँकांचा आहे.
सरकारी बँकांकडून वितरित कर्जाचे लाभार्थी सर्वाधिक ३५ टक्के जरी असले तरी या बँकांकडून वितरित कर्जाचे मूल्य हे तुलनेने सर्वात कमी म्हणजे १९.६ टक्के इतकेच आहे.
जून २०२० तिमाहीअखेर या उद्योग क्षेत्रावरील एकूण १.३१ लाख कोटी रुपयांचा कर्जभार, वाहन उद्योगाच्या ९.४० लाख कोटी रुपयांच्या उलाढालीच्या तुलनेत जवळपास १२ टक्के इतका आहे.