उपनिरीक्षक महिलेशी प्रेम प्रकरण नडले

'त्या' पोलीस शिपायाचे निलंबन

0
पुणे : पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत पोलीस शिपायाचे प्रेमसंबंध असताना झालेल्या अंतर्गत वादातून पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका पोलीस शिपायाने केला. मात्र याची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तडकाफडकी त्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन केले.

हा प्रकार दिघी पोलीस ठाण्यात एक जानेवारी रोजी घडला होता.

पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक महिला दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्यांच्यात अंतर्गत वादविवाद झाले. त्यातून चिडून पोलीस शिपायाने उपनिरीक्षक महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देत दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ यावर निर्णय घेतला. त्या पोलीस शिपायाचे मंगळवारी निलंबन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.