तांडव वेब सीरीजची तक्रार आली असून योग्य कारवाई होईल : अनिल देशमुख

0

मुंबई : ‘आमच्याकडे तांडव वेब सीरीजची तक्रार करण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या कोणाचंही नियंत्रण नाही, त्यामुळे वाद निर्माण होत आहेत. नियमानुसार त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने नियंत्रण आणण्यासाठी कायदा तयार करावा अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

‘तांडव’या ऍमेझॉन प्राईमच्या वेब सीरीजमुळे वाद निर्माण झाले आहेत. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या वेह सीरीजला अनेक ठिकाणाहून विरोध झाला. अनेक पोलीस ठाण्यात या वेब सीरीजच्या निर्मात्या आणि कलाकाराविरोधात तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत. यानंतर ‘तांडव’ च्या दिग्दर्शकांनी अली अब्बास जफर यांनी ट्विटरवर एक निवेदन जारी करून सर्वांची माफी मागितली आहे.

अली अब्बास जफर यांनी या वेब सीरीजचे दोन मुख्य भाग असल्याचं म्हटलं आहे. पहिला भाग डिस्क्लेमर सारखा आहे. तो सीरीज सुरू होण्यापूर्वी दाखवलेला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.