अमेरिकेत नव्या सरकारच्या पदार्पणानंतर कोरोनावरील नव्या उपायांसह बजेटमधील महत्त्वाच्या घोषणांमुळे आज बीएसईचे सेन्सेक्स प्री-ओपनिंग ट्रेडमध्ये 50 हजारचा टप्पा पार केला आहे. बीएसईचे सेन्सेक्स 319 अंकांनी तेजीत आहे. सेन्सेक्स 50,111.93 टप्प्यावर आला. तर निफ्टी 14,730.95 च्या अंकावर आहे.
काल आयटी, उर्जा आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली घोडदौड दिसत होती. त्यामुळे बुधवारी शेअर बाजारात नव्या उंचाक दिसून आला. बीएसईच्या 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 393.83 अंकांवर म्हणजेच 0.80 टक्क्यांनी वाढून 49792.12 अंकांवर येऊन बंद झाला होता. या प्रकारेच एनएसईच्या निफ्टी 123.55 अंकांवर म्हणजेच 0.85 टक्क्यांनी उसळी मारुन 14,644.70 अंकांनी उसळी मारली होती.
Sensex crosses 50,000 mark in pre-opening session pic.twitter.com/rfEX66qkkZ
– ANI (@ANI) January 21, 2021