शहरात आज पासून मीटर प्रमाणे रिक्षा भाडे

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये आजपासुन रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे दर आकरावा लागणार आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करुन तसेच स्वतः १ किलो मिटर अंतरावर प्रवास करुन ऑनलाईन पैसे देखील दिले.

कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते उपक्रमाचा आरंभ झाला. यावेळी अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ.सागर कवडे
सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले, वाहतूक पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे. आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड सिटिझन फोरमकडून शहरात मिटर प्रमाणे रिक्षा सुरू करा. अशी मागणी होत होती. अखेर तो दिवस आज उजाडला. त्यामुळे रिक्षाला बंधनकारक करण्यात आले आहे.

एक किलोमीटर – 18 रुपये
दोन किलोमीटर – 25 रुपये
10 किलोमीटर – 123 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.