पुणे : भीषण आगीत मृत्यू झालेल्या पाच जणांच्या कुटुंबाला सीरम इन्स्टिट्यूटकडून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे.
“आज SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत.” असं सायरस पुनावाला यांनी जाहीर केलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूटमधील अग्नितांडवात, प्रतिक पाष्टे – डेक्कन पुणे, महेंद्र इंगळे – पुणे, रमाशंकर हरिजन – उत्तर प्रदेश, बिपीन सरोज – उत्तर प्रदेश, सुशीलकुमार पांडे – बिहार या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती.
पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.