पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नववी आणि त्या पुढील कोचिंग क्लासेस आणि खाजगी प्रशिक्षण संस्था तसेच उद्याने सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
लाईट हाऊस, कौशल्य प्रशिक्षण संस्था, टायपिंग व संगणक, प्रशिक्षण संस्था तसेच सरकारी आणि खाजगी वाचनालये, अभ्यासिका शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करत सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
संस्थानी प्रशिक्षणार्थीची प्रवेश करताना थर्मन गन द्वारे तपासणी करणे. मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सर्व प्रशिक्षक व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात यावी. सामाजिक अंतर ठेवणे.असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.