पिंपरीत पकडले 24 पिस्टल आणि 38 जिवंत काडतुसे

भोसरी पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन केली कारवाई

0
पिंपरी : सराईत गुन्हेगाराला अटक करुन त्याच्या चौकशी मध्ये मिळालेल्या माहितीवरून भोसरी पोलिसांनी गुन्हेगारी टोळीना पिस्टल पुरविणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी मध्यप्रदेश मध्ये जाऊन एकूण 24 पिस्टल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त केली असून 12 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. बबलूसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला (रा. मध्यप्रदेश), कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (धुळे), उमेश अरूण रायरीकर (बहुली, हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (मुंडवा), धीरज अनिल ढगारे (हडपसर), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (पेरणे फाटा, दौड), मॅण्टि संजय बोथ उर्फ वाल्मिकी (पिंपरी), यश उर्फ बबलू मारुती दिसले (बोपखेल), अमित बाळासाहेब दगडे (बावधन), राहुल गुलाब वाल्हेकर (भोर) आणि संदीप आनंता भुंडे (बावधन) या गुन्हेगारांना अटक केली आहे.

पोलीस भोसरी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि सुमित देवकर यांना एका गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यानुसार रुपेश पाटील याला ताब्यात घेऊन 4 पिस्टल आणि 4 काडतुसे जप्त केली. त्याच्याकडे कसून चौकशी करुन त्याचा पुढील तपास सुरु केला. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे आणि त्यांचे पथक मध्यप्रदेशात गेले. एका जगलात पिस्टलचा मुख्य डीलर रॉनी याला ताब्यात घेतले.

भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करुन सुमारे 12 लाख रुपये किंमतीचे 24 पिस्टल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुळशी पॅटर्न प्रमाणे गुन्हे करणारे गुन्हेगार नन्या उर्फ उमेश रायकर, राहुल वाल्हेकर, धीरज ढगारे यांनाही अटक करण्यात आलेली आहे. या गुन्हेगारावर यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

सोशल मीडिया आणि येरवडा जेलमधील गुन्हेगारांची संपर्क साधून उत्तरप्रदेश मध्ये तयार झालेली पिस्टल जळगाव मार्गे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात सप्लाय केली जात होती.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक निरीक्षक कैलासे, अंमलदार गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, संतोष महाडिक, आशिष गोपी या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.