पिंपरी : सर्व पोलीस ठाण्याचे आयएसआय सर्टिफिकेश केले जात आहे. कंपन्यांनी जर पोलिसांची मदत केली तर कंपन्यांच्या अडचणीत पोलीस दोन पावले पुढे जाऊन त्यांची मदत करतील. इंडस्ट्रीचे लोक त्यांच्यावरील अत्याचाराबाबत अजूनही पुढे येत नाहीत. त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस कमी पडणार नाहीत, असाच पोलिसांचा प्रयत्न असल्याचे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मोटार परिवहन विभाग पोलीस निरीक्षक यांचे कार्यालय, ऑइल रूम, मॅकेनिकल रूम, भांडार रूम आणि चालक विश्रांती कक्षाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्था, आकुर्डी यांच्या वतीने हे काम करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त बोलत होते.
या कार्यक्रमासाठी उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे, गणेश बिरादार, उप अधीक्षक गायत्री पवार, पोलीस निरीक्षक ए. एन. सय्यद, बजाज ऑटो लिमिटेडचे प्रदीप श्रीवास्तव, जनकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे कैलास झांजरी, सीईओडॉ. अरुण जोशी, सतीश धामणे, पी. एस. मुखर्जी, अनिल भंडारे, भवरलाल, सुशील आढाव, मदन गायकवाड आदी उपस्थित होते.
आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “नीतिशास्त्र शिकणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीला पूर्णत्व देण्यासाठी त्यातली एक एक गोष्ट महत्वाची असते. सक्षम पोलिसिंग करण्यासाठी सरकार मदतीसाठी प्रयत्न करत आहे. जी संस्था सगळ्यांना सोबत घेऊन जाते आणि ज्या संस्थेसोबत सर्वजण असतात तीच संस्था यशस्वी होते. एमटीचे ए. एन. सय्यद यांनी मोलाची कामगिरी केली आहे.