जखमीची पाच लाखांची रोकड दिली पोलिसांनी नातेवाईकांकडे

0

पिंपरी : समाजात पोलीस म्हटले की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. पैसे खाणारे, मदत न करणारे या नजरेने पाहिले जाते. मात्र याला सांगवी पोलिसांनी छेद दिला आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीकडील चार लाख 95 हजाराची रोकड पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकाकडे दिली.

एका इसमाचा राजीव गांधी पुलाजवळ स्वतः मोटर सायकल वरून पडून अपघात झाला असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक भोंगळे, पोलीस नाईक पोटे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली.

प्रभुलाल मनानी (65) हे जखमी असल्याचे समजले. तसेच त्यांच्या पर्स मध्ये 4 लाख 95 हजार रुपये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मनानी यांच्या मोबाईल फोन मधून त्यांचा मुलगा नामे अमित प्रभुलाल मनानी यांना संपर्क करून हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. जखमी इसमाकडे मिळालेल्या हॅन्ड पर्समधील एकूण रक्कम रुपये 4,95,000/- व मोबाईल फोन आधार कार्ड अशा वस्तु तात्काळ जखमी इसमाच्या मुलाच्या ताब्यात दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.