स्मशानभूमीत अघोरी पूजा; 5 लाखांची फसवणूक; दोघांना अटक

0

पिंपरी : कुटुंबाची आर्थिक स्थिती इतर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी भोसे गावातील स्मशानभूमीत अनिष्ट प्रथा असलेली अघोरी पूजा केली. गावकऱ्यांनी याबाबत विचारणा करताच पूजा करणारे पळून गेले. भोंदू बाबा आणि त्याच्या साथीदारांनी ज्या व्यक्तीकडून 5 लाख 13 हजार रुपयांची फसवनजक केली. हा प्रकार ऑक्टोबर 2020 पासून 29 जानेवारी 2021 या कालावधीत खेड तालुक्यातील भोसे गावातील स्मशानभूमीत घडला.

या प्रकरणी आनंद सुरेंदर जैन (35, रा. हैदराबाद) यांनी फिर्याद दिली आहे. तर साधुबाबा चंद्रकांत नायर, बाळासाहेब मारुती मोहिते (रा. भोसे), नरेंद्र हनुमंत गायकवाड (52, रा. पिंपरी), गणेश मारुती चव्हाण (38, रा. भोसरी) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नरेंद्र आणि गणेश या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांच्या आर्थिक आणि इतर अडचणी तांत्रिक व अनिष्ट पूजेद्वारे जादूटोणा करून सोडवतो असे आरोपींनी जैन यांना सांगितले. जैन यांना आरोपींनी तांत्रिक व्हिडीओ दाखवले. मंत्र केलेले कुंकू देऊन जैन यांच्या घरी जाऊन होम हवन देखील आरोपींनी केले.

त्यातून जैन यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी पैशांची मागणी करून जैन यांच्याकडून 5 लाख 13 हजार रुपये घेतले. त्यानंतर 29 जानेवारी रोजी रात्री दीड वाजता भोसे येथील स्मशानभूमीत आरोपींनी एक अघोरी पूजा केली. त्यावेळी भोसे येथील स्थानिक नागरिकांना याची शंका आली. नागरिकांनी आरोपींना पूजा करण्याबाबत विचारणा केली असता सर्व आरोपी स्मशानभूमीतून पळून गेले.

आपल्या अंगात अतिद्रियशक्ती असल्याचे आज कामक्या देवी गोहाटी येथील कपाल अघोरी मठात 25 वर्ष शिक्षा ग्रहण केल्याचे आरोपींनी जैन यांना सांगितले होते. त्याद्वारे जैन यांच्याकडून 5 लाख 13 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

याबाबत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे 3 (1), (2), (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.