दिल्लीत स्फोट म्हणजे मोठ्या कटाची चाचणी असण्याची शक्यता

0

नवी दिल्ली : दिल्ली येथील इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटानंतर देशात हायअलर्ट आहे. दिल्ली पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले असून हा स्फोट म्हणजे काही मोठ्या कटाची चाचणी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

फॉरेन्सिक टीमने यासंपूर्ण परिसराची तपासणी केली आहे. या स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचा पुरावा मिळाला आहे. ज्या जागेवर हा स्फोट झाला. तेथे छोटा खड्डा पडला आहे. आरडीएक्सचा वापर झाला असता तर त्याचा परिणाम जास्त झाला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांना घटनास्थळावरुन सीसीटीव्ही फुटेज, अर्धा जळालेल्या गुलाबी रंगाचा स्कार्फ, आणि इस्त्रायल राजदूताला उद्देशून लिहिलेला लिफाफा मिळाला आहे. घटनास्थळापासून १२ यार्ड अंतरावर लिफाफा सापडला आहे. इस्त्रायली राजदूताला पत्र पाठविले आहे. पोलीस त्याचे बोटांचे ठसे शोधून काढत आहेत. तसेच त्यातील सामुग्री तपासून घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.