मुंबई : एका वेब सीरीजच्या चित्रीकरणाच्या निमित्त राहत असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्रीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचं वृत्त पीटीआयने दिलं असून याप्रकरणी रविवारी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री हॉटेलच्या ३७ व्या मजल्यावरील एका वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी पीडित गेली होती. त्यावेळी अचानक आरोपी दिलेश्वर महंत (२२) याने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला घट्ट पकडून ठेवले.
आरोपीच्या तावडीतून महिलेने कशीतरी स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर आरोपी महंतला हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांकडून अजून चौकशी सुरू आहे.