शिवसेनेच्या आणखी एका नेत्याची ईडीकडून चौकशी

0

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सुमारे चार तास कसून चौकशी केली. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत एक हजार कोटीचा गैरव्यवहार झाला आहे, त्याला माजी खासदार आनंद आडसूळ व अन्य संचालक जबाबदार असल्याची तक्रार केली आहे. याबाबत ईडी व अन्य केंद्रीय तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे.

त्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी आडसूळ यांना ९ फेब्रुवारीला कार्यालयात हजर रहाण्यास नोटीस बजावली होती. त्यानुसार दुपारी तीनच्या सुमारास ते बेलार्ड पियर्ड येथील कार्यालयात पोहोचले. सायंकाळी सातपर्यंत त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.