ग्रामपंचायतेचा गाडा हाकणार पती-पत्नी

0

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळवणे ग्रामपंचायतीवर नवरा-बायको अधिकार गाजवणार आहेत. कारण या
ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी पती पत्नीस बिनविरोध सदस्य केले आणि त्यानंतर पत्नीची सरपंचपदी तर पतीची उपसरपंचपदी निवड केली आहे.

जयश्री सचिन पठारे या सरपंच तर त्यांचे पती सचिन पठारे हे उपसरपंच झाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात या दोघा नवरा बायकोच्या राजकीय यशाची चर्चा रंगली आहे.

वाळवणे गावची 2 हजार लोकसंख्या असून 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकी 4 बिनविरोध सदस्य झाले असून त्यात हे दोघेही नवरा-बायको बिनविरोध निवडून आले.

निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने हा मान जयश्री पठारे यांना मिळाला असून गावाने त्यांचे पती सचिन पठारे यांना उपसरपंच करायचं ठरवलं आहे. त्यामुळे दोघेही आता सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.