पुणे : क्रिकेट सामन्यावर बेटिंग मध्ये हरलेल्या हॉटेल व्यवसायिकाकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केले आहे.
याप्रकरणी 23 वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गौरव आहुजा (रा. टिळक रोड) आणि अजय शिंदे (रा. खडक पोलिस लाईन) या दोघांना अटक केली आहे. तर सचिन पोटे फरार आहे.
फिर्यादी हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांचे वाइन शॉपीचे देखील दुकान आहेत. त्यांची आरोपी गौरव आहुजा याच्याशी ओळख होती. गौरव हा ऑनलाइन बेटिंगचा जुगार चालवत असे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना फोनकरून तुझ्या खानदानाला गायब करतो, तसेच फिर्यादी यांचा मित्राला देखील तू मला ओळ्खत नाही का, मी अजय शिंदे खडक पोलीस लाईन बाहेर कोणालाही विचार, मॅचचे पैसे आहेत ते दे, असे म्हणत अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली आहे, असे तक्रारीत म्हंटले आहे.