उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करण्याची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी

0

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण-करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करावी. उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदार बारणे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. याबाबतचे निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने 16 मे1992 रोजी अध्यादेश काढून रायगड जिल्ह्यातील बोरी-पाखाडी, केगाव, म्हातवली या तीन गावातील महसुली हद्दीतील आणि उरण शहरातील सुमारे 271 हेक्टर क्षेत्रातील शेती, बिनशेती जमीन उरण-करंजा येथील नौदल शस्त्रासागर डेपोसाठी सेफ्टी झोन आरक्षण जाहीर केले आहे. या सेफ्टी झोन परिसरात सुमारे 40 हजाराच्या आसपास रहिवासी वास्तव्यास आहेत.

राज्य सरकारने 14 ऑगस्ट 2019, 15जानेवारी 2021 रोजी सेफ्टी झोन रद्द करण्यासाठी संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मंजुरीसाठी हा विषय खात्याकडे प्रलंबित आहे. त्यावर कारवाई करत उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी विनंती  खासदार बारणे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.