या कोरोना सेंटरच्या भ्रष्टाचारात सत्ताधारी भाजप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त अजित पवार, भाजपमधील काही नगरसेवक असल्याचे दिसून येते. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आपल्यावर आरोप होताच स्वतःच्या पक्षातील नगरसेवकांना दुस – याच्या दावणीला बांधण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. तसेच भ्रष्टाराचारात सैराट झालेल्या सत्ताधारी भाजप व प्रशासनाविरोधात आम्ही आंदोलने करत आहोत व करणार आहोत.
भ्रष्टाचारा विरोधात वेळप्रसंगी न्यायालयातही जाणार आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे गेले आहेत . राज्याच्या अर्थखात्याची महत्वाची जबाबाबदारी त्यांच्याकडे असल्याने दादा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व भ्रष्टाचाराचे ‘ शुभ मंगल सावधान ‘ करणार आहेत , असेही काटे यांनी म्हटले आहे . शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चार विभागात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते .
त्यावर आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आकडा प्रशासनाने व सत्ताधाऱ्यानी अद्याप जाहीर केला नाही . जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा भ्रष्टाचाराचे पोर किती मोठे झाले हे सर्वसामान्य पिंपरी – चिंचवडकरांना समजेल. नुकतीच यातील एक झलक भोसरीतील दोन कोरोना केअर सेंटरला दिलेल्या खर्चावरून समजते . ते कोविड केअर सेंटर सुरू केल्याचा केवळ दिखावा केला होता. कोणतेही साहित्य , कर्मचारी उपलब्ध केले नसल्याने या सेंटरमध्ये एकाही कोरोना करणांवर उपचार झाले नाहीत. तरीही कोट्यवधी देताना सत्ताधारी झोपले होते का ? असा सवाल काटे यांनी विचारला आहे.