माजी नगरसेविकेची भररस्त्यात गोळया झाडून हत्या

0
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये भररस्तात गोळ्या घालून माजी नगसेविकेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मीरा ठाकूर, असे या माजी नगरसेविकेचे नाव आहे.

हत्येनंतर आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला असून सध्या ते फरार आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अज्ञातांनी गोळ्या झाडल्याने ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या हल्ल्यात त्यांची मुलगी वाचली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच मीरा ठाकूर यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.