एक हात मदतीचा ; गरजू आणि अनाथांना अन्न व फळेवाटप

0
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पिंपरी चिंचवड शहरात सावली निवारा केंद्र येथे गरजू व निराधार लोकांना अन्न व फळे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

शहरात जे अपंग आणि गरजू लोकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या जवळपास 35 ते 40 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोगजी वाघेरे , तसेच अकबर मुल्ला, सुरेश वाघेरे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संजोग वाघेरे यांच्या हस्ते गरजूंना अन्न धान्य वाटप करण्यात आले. संतोष वाघेरे यांनी या लोकांची विचारपूस केली.

Leave A Reply

Your email address will not be published.