भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

0
जेजुरी : शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर गोंधळ घालत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी जेजुरी देवस्थानच्या काही कर्मचाऱ्यांसोबत त्यांची झटापट झाल्याची घटनाही याठिकाणी घडली आहे. इतकेच नव्हे तर यावेळी पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.

खरतरं, खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र आज पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.