फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट; 11 जणांचा मृत्यू

0

तमिळनाडू : फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 36 जण जखमी झाले आहेत. तामिळनाडूतील विरुधनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात ही फॅक्टरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

या फॅक्टरीत फटाके बनविण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स एकत्र केले जात होते. त्याच वेळी हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की काही अंतरावरील घरांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर काही वेळातच अग्नीशमन दलाच्या दहा गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या.

मोठ्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात दलाला यश आले. मात्र तोपर्यंत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या आागीत 36 जण भाजले असून त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

तामिळनाडूतील या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधांनांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.